मुंबई | सक्तवसुली संचलनालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. ईडीने राहुल गांधीची चौकशी केल्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी ही चौकशी सुरू असतानाच जोरदार निदर्शने करायला सुरूवात केली. तर यावरून आता भाजप नेत्यांनी देखील प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.
सावरकर नाही हा राहुल गांधी आहे. हे राहुल गांधी आहेत झुकणार नाहीत, अशी पोस्टरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली. या घटनेवरून आता राजकारण तापायला सुरूवात झाली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गांधी घराण्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका कृतीचा आधार घेत गांधी घराण्यावर हल्लाबोल केला आहे.
50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला ‘तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?’ असं सावरकरांनी भर न्यायालयात ठणकावून विचारलं. या घटनेचा दाखला देत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला हे कळणं अशक्यप्राय असल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत गांधी घराण्यावर टीका केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरूनही चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या आगे आगे देखो होता है क्या, अशा खोचक शब्दात चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.
५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला”तुमचे राज्य तरी ५० वर्षे टिकेल काय?”असे भर न्यायालयात ठणकावून विचारणारे सावरकर;
आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहेराहुल बाबा पूछताछ से रोता है क्या
आगे आगे देखो होता है क्या.. pic.twitter.com/4mGMlsbvSe— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 13, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
डॉ. प्रकाश आमटेंची कॅन्सरशी झुंज; तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
सदाभाऊ खोत यांच्याकडून अखेरच्या क्षणी माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?
“मुख्यमंत्री वेळच देत नाहीत, आमचा एकच आधार ते म्हणजे अजित पवार”
‘अजितदादा परत आमच्यासोबत या’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
“उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”