मुंबई | आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा रखडलेला आणि बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. यावेळी पहिल्या टप्प्यातील मंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. शिंदे यांच्या गटातील 9 आणि भाजपच्या 9 अशा एकूण 18 आमदारांनी शपथ घेतली.
महाविकास आघाडी सरकाच्या (MVA) सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी देखील यावेळी शपथ घेतली. पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना वनमंत्री पदावरुन राजीनामा द्यावा लागला होता.
आज पुन्हा एकदा त्यांनी शिंदे गटाकडून शपथ घेतल्याने त्यांच्याविरोधात वाद पेटला आहे. संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आक्रमक झाल्या आहेत.
पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड याला पुन्हा मंत्रिपद दिले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाला असला, तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरु ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. भाजपने त्यावेळी संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलने केली होती.
त्यावेळी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने (MVA) राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिन चीट दिली होती. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद दिले गेल्याचे बोलले जाते आहे.
राठोड मंत्री झाल्याने अनेकांनी त्यांच्या नावाने गाजलेले पूजा चव्हाण प्रकरण बाहेर काढले. राठोड यांनी यावर मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकनाथ शिंदेंनी देखील त्यांना क्लिन चीट मिळाल्याचे म्हंटले आहेत.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
महत्वाच्या बातम्या –
एकीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तर दुसरीकडे विनायक राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं
टीईटी घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर!
मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, वाचा कुणाला संधी मिळणार