“गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू असल्याचं पहायला मिळतंय.

संजय राऊत सतत किरीट सोमय्यांवर टीका करताना दिसत आहे. तसेच किरीट सोमय्या देखील याला वारंवार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय.

2024 नंतर देशात अनेक बदल होणार आहेत. तसेच या देशातील किरीट सोमय्यांसारखे चु.. लोक नाहीसे होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. याला सोमय्या यांनीही प्रत्युत्तर देत मला एकदाच शिव्या देऊन टाका, असं होतं म्हटलं होतं. या वादात आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. गधे को दिया मान, गधा पहूंचा आसमान, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केली आहे.

शिव्या द्यायला शिवशिवणाऱ्या शिवराळ मनस्थितीचं नाव सर्वज्ञानी… गथे को दिया मान गधा पहूंचा आसमान, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विटमधून संजय राऊत यांनी टोला लगावल्याची चर्चा आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये शिवीगाळ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या

…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर! 

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं

डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा! 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…”