महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीला खिंडार; चित्रा वाघ ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार???

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. काल सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. त्यानंतर आज लगोलग राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भाजपात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याचं कळतंय.

चित्रा वाघ या राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जायच्या. त्या महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक होत आणि सरकारवर तोफ डागत जोरदार आंदोलन करत असत. पण आता त्याच भाजपात प्रवेश करण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार आहे.

राष्ट्रवादीचे मुंबई शहराध्यक्ष सचिन अहिर यांनी काल पक्षाला राम राम ठोकला होता. त्यानंतर आज चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांची अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-सत्तेत आलो तर भूमिपुत्रांना नोकरीत 75% आरक्षण देणार; अजित पवारांचं मोठं आश्वासन

-मोदी लाटेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-सचिन अहिरांच्या मनगटावर ‘शिवबंधन’; शिवसेनेचे सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

-“भाजपचा बकासूर झालाय…भूकच भागत नाही”

-30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार; पण विधानसभेला ‘इतक्या’ जागा जिंकणार- अजित पवार

IMPIMP