“लोणीकरांचं ते वक्तव्य आक्षेपार्हच… मी त्यांचं समर्थन करणार नाही”

मुंबई |  राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. जालना जिह्यातील परतूर तालुक्याच्या महिला तहसीलदार अधिकाऱ्याविषयी त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू नाहीतर तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतातच, असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील लोणीकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.

बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य निश्चितच निषेध नोंदवण्यासारखं आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अगदी कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भाषण करण्याच्या ओघात किंवा बोलण्याच्या भरात सुद्धा शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. त्यांच्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतलीये. तसंच राज्याचा महिला आयोग त्यांच्या वक्तव्याची दखल घेईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू नाहीतर तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतातच, असं आक्षेपार्ह वक्तव्य लोणीकर यांनी केलं आहे. संपूर्ण राज्यातून त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संतापाची लाट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

बबनराव लोणीकर, जिजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरॉईनच आहेत. याची काळजी तुम्ही करू नका पण तुमच्यासारखे आजूबाजूला व्हीलन आहेत. तुमच्यासारख्या व्हिलनचा सुफडासाफ करायला वेळ लागणार नाही, अशी ताकीद देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांनी लोकणीकरांना इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी गोंधळलेला अर्थसंकल्प मांडला- जयंत पाटील

-मोदी सरकारच्या बजेटवर रोहित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले ‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’!

-“नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्म्यानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं”

-अहो आव्हाडजी, अदिवासींच्या घरात खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर कुठून आलं?

-सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव