महाराष्ट्र मुंबई

चित्रा वाघ यांनी राजीनाम्याचं ट्वीट केलं अन् लोकं म्हणाले; ‘ताई तुम्हीसुद्धा…!’

मुंबई |  चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या. महिलांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणांसाठी आणि मांडणीसाठी त्या प्रसिद्ध होत्या. सत्ताधारी भाजपवर त्या कडाडून हल्लाबोल करायच्या. परंतू त्यांनी राष्ट्रवादीचा तडकाफडकी राजीनामा दिला.

आपण राजीनामा देत असल्याचं ट्वीट त्यांनी केलं. आणि त्यांच्या ट्वीटवर रिप्लाय म्हणून लोकांनी काही बोलक्या प्रतिक्रिया दिल्या.

अनेक नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांनी दिलेल्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली. तुम्ही पक्षाच्या कठीण काळात साथ सोडायला नको होती, असा एकंदरित सूर होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर चित्रा वाघ चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सुद्धा टाकली होती.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ सरकारी नोकरीत होते. मात्र २०१६ साली त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला. ४ लाख रुपयांची लाच घेताना ते पकडले गेले. तेव्हापासून चित्रा वाघ बॅकफूटवर गेल्या. 

आपले पती या प्रकरणातून सहीसलामत सुटावेत हे चित्रा वाघ यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांना भाजपची मदत लागेल. त्यामुळेच चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येतील; ‘या’ नेत्याचा दावा!

-या कारणामुळे चित्रा वाघ यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ला सोडचिठ्ठी???

-राणा जगजितसिंह पवारांना धक्का देणार??; राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार!

-राष्ट्रवादीला खिंडार; चित्रा वाघ ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार???

-सत्तेत आलो तर भूमिपुत्रांना नोकरीत 75% आरक्षण देणार; अजित पवारांचं मोठं आश्वासन

IMPIMP