मुंबई | साताऱ्यात एक संतापजनक प्रकार घडला. पळसवडे गावच्या माजी सरपंचानी वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच चित्रा वाघ यांनी यावेळी बोलताना गृहराज्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला आहे.
शंभुराज देसाईजी तुम्ही गृहराज्यंत्री… तुम्हाला तुमचाच जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार, असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, गावचा माजी सरपंच असलेला व्यक्ती एका महिला वनरक्षकाला बेदम मारहाण (lady forest guard beaten) करत आहे.
या कृत्यात या माजी सरपंचाला त्याच्या पत्नीनेही मदत केली. या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आणि या सरपंचावर टीकेचा भडीमार सुरू झाला. या प्रकरणात आरोपीला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत
या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतलं जाणार नाही.
मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ
“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी”
‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘भूत लागल्या प्रमाणे…’
राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज