मुंबई | अभिनेता सोनूने लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुर-कामगारांना त्यांच्या-त्यांच्या घरी पोहचवण्याचं काम केलं. परंतू त्याच्या या कामामागे कुठली तरी यंत्रणा काम करते आहे, असं म्हणत शिवसेनेने भाजपचं नाव न घेता सोनू सूदला थेट भाजपशी जोडलं. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस. लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच या आशयाचा मेसेज वॉट्सअॅपवरून आल्याचं सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.
संजय राऊत यांनी सोनू सूदवर शरसंधान साधल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजप नेत्यांनी शिवसेनेचा भूमिकेचा समाचार घेत भाजपचीच लोकं चांगलं काम करू शकतात असा शिवसेनेला विश्वास आहे, असा टोमणा मारत जर सोनू सूदला भाजपशी जोडत असाल तर आम्हाला आनंद आहे, असं म्हटलं.
दुसरीकडे सोनूने राजकीय वातावरण तापल्यावर रविवारी रात्री उशिरा मातोश्रीवर जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे देखील उपस्थित होते. या भेटीचा तपशील जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, “सोनूने स्थलांतरित मजुरांना गावाकडे जाण्याविषयी जी काही मदत केली त्यावर आमच्यात दीर्घ चर्चा झाली”.
डिअर सोनू सूद,
राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस.लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही…..🤣😂
साभार – Whatsapp— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2020
महत्वाच्या बातम्या-
-‘कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र…
-महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले
-‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!
-कोकणच्या मदतीला भाजपा, 14 ट्रक मदतसामुग्री रवाना- देवेंद्र फडणवीस
-भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं; चंद्रकांतदादांचा निशाणा