मुंबई | महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणलेत.
राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता या निकालावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलीये.
अकेला देवेंद्र क्या करेगा, असं म्हणणाऱ्यांना राज्यसभेच्या विजयानंतर करेक्ट कार्यक्रम, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलं आहे. तसेच कोई काफी अकेला है, और अकेला ही काफी है, रणांगणात जिंकण्यासाठी पुरेसा आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी हिंदी शायरी ट्विट केली आहे. ‘वह जमाने के लिए अकेला ही काफी है, हमारी हकीकत को ख्वाब समझने वालें’, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून भाजपवर टीका केली होती. भाजपने नक्कीच जागा जिंकली पण मी त्यांचा विजय मानत नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच निवडणूक आयोगाने भाजपची बाजू घेतली, असा आरोपही संजय राऊतांनी केला होता. त्यावरून चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देश संविधानावर चालतो, तुमच्या मानण्या किंवा न मानण्यावर चालत नाही हो सर्वज्ञानी, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजपच्या तिसऱ्या उमेदवारास निवडूण आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीने महाविकास आघाडीला धूळ चारली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना वेगवेगळ्या मार्गांनी माणसं आपलीशी केली, असं म्हटलं आहे. अशातच चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही”
देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट
…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ