“भगिनींना आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडून नवीन टोमणे शिकण्याची सुवर्णसंधी”

मुंबई | मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे आणि या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण-कोण असतील याची चर्चा सुरु झाली आहे.

मशिदीवरील भोंग्यांवरून महिनाभर सुरु असलेला वाद, हिंदुत्वावरून सुरु असलेली लढाई, भाजपकडून होणारे आरोप प्रत्यारोप आणि राणा दाम्पत्यानं दिलेलं आव्हान….. या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या सभेतून घेणार आहेत.

घेओवैशींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आज राज्यातील तमाम महिला भगिनींना सन्माननीय उद्धव ठाकरे
यांच्याकडनं नवीन टोमणे शिकण्याची मोठी सुवर्णसंधीच, असा टोला चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले… 

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…” 

‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान