“न्यायालयाने ठाकरे सरकारला अजून एक थप्पड मारली”

मुंबई | राज्यासह देशात हनुमान चालीसा प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर न्यायालयानं राजद्रोहाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे.

राणा दाम्पत्यानं ठाकरे सरकारला आव्हान देत मुंबईत काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा म्हणण्याचा अट्टहास धरला होता. तेव्हापासून हे प्रकरण गाजत आहे.

राणा दाम्पत्यानं सरकारला धारेवर धरत असताना कायदा व सुव्यवस्थेचे तिनतेरा वाजवण्यासारखी परिस्थिती निर्माण केल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.

आता न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे.

राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 12 दिवस लोकप्रतिनिधींना सबळ कारणाशिवाय कोठडीत ठेवणे हे राज्य सरकारच्या सडलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे, असं वाघ म्हणाल्या आहेत.

आज न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारला अजून एक थप्पड मारली हे योग्यच झाले, अशी जहरी टीका करत वाघ यांनी ठाकरे सरकारला घेरलं आहे.

नवनीत राणा यांना गेल्या 10 दिवसांपासून 12 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. यावेळी राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचं देखील समोर आलं होतं.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर करताना न्यायालयानं कसल्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करण्यास मनाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत….- राज ठाकरे

संदीप देशपांडेंनी पोलिसांना चकवा देत काढला पळ; झटापटीत महिला पोलीस जखमी

‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ 

मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं  

…तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं?