पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ

बऱ्याच दिवसांपासून परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येबद्दल चर्चा रंगली आहे. कोण आहे पूजा चव्हाण? तिच्या या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात खलबतं सुरु आहेत. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व्हावी, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. मात्र दुसरीकडे पूजा चव्हाण हिचे कुटूंब नि:शब्द आहेत.

माझ्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाच्या कुटूंबीयांची आहे. त्यानंतर आता भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलचा मोठा पुरावा आहे. मोबाईलमध्ये झालेल्या संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत. ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना मंत्र्याकडून होताना सगळ्यांनी ऐकल्या आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

या सर्व प्रकरणाबाबत पोलिस कोणताच पवित्रा किंवा काहीही स्पष्टता देत नाही. पूजा चव्हाणच्या परिवारावर दबाव असू शकेल पोलिस अशा केसेसमध्ये स्यु-मोटो दाखल करुन घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नको. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना मुसक्या आवळायाच्या सोडून कसली वाट बघताय?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण                                                                                                                                      मूळची परळीची असलेली 22 वर्षांची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात राहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकली. हाॅस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यु झाला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्यांचा संबंध असल्याची जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली.

प्रेमसंबंधातूून पूजानं स्वत:ला संपवल्यांच बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलिसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करत तिच्या मृत्युची नोंद केली आहे. मात्र याप्रकरणातील एक अॅडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.

आॅडिओ क्लिपमध्ये मंत्र्याचा आवाज                                                                                                                  पूजा चव्हाण आणि मंत्री यांच्यातील आॅडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी लवकर या असे बंजारा भाषेत मंत्र्याला बोलावते आहे. या सर्व प्रकरणात आॅडिओ क्लिपचा फाॅरेन्सिक अहवाल अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र, राज्याच्या सरकारमधील एक मंत्री या सर्व प्रकरणात अडकू शकतो, याची चर्चा सध्या चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

जाणून घ्या शरीरासाठी गुणकारी असणाऱ्या काळ्या तांदळाविषयी, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

सोन्याचा आजचा भाव, 9,000 रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच येणार बाजारात

उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, 5 लाखांहून आहे कमी किंमत