मुंबई | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडलं होतं. मात्र, आता महाराष्ट्राच्या चित्ररथावरून सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटत आहेत.
अभिताभ बच्चन यांचा आवाज महाराष्ट्राच्या चित्ररथाचे मुख्य आकर्षण होता का?, अशी विचारणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. हा आवाज सुदेश भोसले यांचा असल्याचे कळताच त्यांनी यांची नक्कल का केली?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या राजपथावरील संचलनामध्ये बॉलिवूड आणण्याचा का प्रयत्न केला?, असा प्रश्न सोशल मीडियावर केला. चित्ररथावर साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीवरुनही नाराजी नोंदवली जात आहे.
प्रतिकृतीवरून मोर हा कोंबडीप्रमाणे दिसत होता, तर शेकरू हा उंदीराप्रमाणे दिसत होता, असं मत नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे.
महाराष्ट्राची माहीत नसलेली जैवविविधता व परंपरा जाणून घेण्याची अनेकांसाठी ही संधी होती, असं या टीकेला उत्तर देताना काहींनी सांगितलं.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी, राज्य फुलपाखरू, राज्य प्राणी याची अनेकांना माहिती नसते. ही मानके समोर आल्याने ती लक्षात राहतील, असंही उत्तर चित्ररथ आवडलेल्या नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.
गायक, कलाकार सुदेश भोसले यांचा हा आवाज माझा मूळचा असून नैसर्गिक आलेला आहे, असंही सुदेश भोसले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या या चित्ररथात शेखरू खार, ब्ल्यू माॅरमाॅन फुलपाखरू, साताऱ्यातील कास पठार, असं दुर्मिळ मानकं दाखवण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द
आदित्य ठाकरे म्हणतात, “नितेश राणेंवर काय बोलायचं? आमची पातळी…”
“ब्रा आणि भगवान”, वादग्रस्त वक्तव्यावरून श्वेता तिवारीच्या अडचणी वाढल्या