महाराष्ट्र मुंबई

स्वार्थ आहे म्हणूनच ‘त्यांचे नेते’ भाजपमध्ये येतात; चंद्रकांत पाटलांची जाहीर कबुली

मुंबई : मुख्यमंत्रिपद शिवसेेनेलाही देण्याबाबत ठरल्याचा दावा जनआशिर्वाद यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करत असले तरीही मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलंय किंवा नाही ते आम्हाला माहित नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. 

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी ते सांगतील त्यावेळी तसं करु, असं पाटलांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

इतर पक्षातील नेते, आमदार स्वार्थासाठीच भाजपमध्ये येतात. ते सहाजिकच आहे. सत्तेत पक्ष मोठा असला की मतदारसंघात कामे होतात. हा हेतू अनेकांचा असतोच, असं चंद्रकांत पाटीलांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणीही करु शकतो. महत्वकांक्षा नसेल तर विकास होत नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विश्वास दाखवणाऱ्यांना लगावला आहे. 

राज्य सरकारचा पाच वर्षातील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

“साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाहीत”

-राष्ट्रवादीला गळती; ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-लक्ष्मण मानेंचा ‘वंचित’ला दे धक्का; ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ची घोषणा

-आजारपणातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींकडून ‘15 मिनिट’वाल्या वक्तव्याचा पुनरुच्चार

-फडणवीसांची महाजनादेश यात्रा; उद्घाटनाला शहा तर समारोपाला मोदी

IMPIMP