मुंबई | सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक (Choreographer) गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांच्यावर लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं आहे. गणेश आचार्य यांच्यावर 2020 मध्ये त्यांच्या एका को-डान्सरने आरोप केले होते.
गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354-A, 354-C, 354-डी , 509, 323, 504, कलम 506 आणि 34 या सर्व आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अषी माहिती ओशिवराचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी दिलीये.
महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘गणेश आचार्यने तिला कथितरित्या सांगितलं की, जर तिला यशस्वी व्हायचं असेल तर मे 2019 मध्ये तिला त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल. तिने नकार दिला आणि सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचं सदस्यत्व रद्द केलं’
35 वर्षीय को-डान्सरने सांगितलं की, ‘तिला पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. गणेश आचार्य यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
अनेक सहकर्मचाऱ्यांनी यापूर्वीही गणेशवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. गणेशने त्यांना वारंवार नाकारलं असून सर्व आरोप खोटे आणि निराधार म्हटलं आहे, असं या डान्सरने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय!
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर; ‘या’ तारखेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी
सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ‘या’ गोष्टी महागणार
“…म्हणून ईडीने धाड टाकली”, सतीश उकेंच्या अटकेनंतर नाना पटोलेंचे गंभीर आरोप