रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!

नवी दिल्ली | क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात, जे आपलं एक वेगळच वलय निर्माण करतात. अगदी असाच एक खेळाडू आहे, त्याच नाव आहे वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल. हे नाव समोर आलं की नुसती जोरदार फटकेबाजी करणारा फलंदाज, डोळ्यांचे पारणे फेडणारे षटकार अशा विविध गोष्टी आठवतात.

खरतर ख्रिस गेल यांची तब्येत आणि उंची असल्यामुळे नेहमी ते मैदान गाजवत असतात. पण ख्रिस गेल नुकतेच अजून एका क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. ख्रिस गेल क्रिकेटबरोबरच आता संगीताच्या दुनियेत एका रॅपरच्या भूमिकेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

नुकतेच ख्रिस गेल यांनी एक संगीत ट्रॅक बनवला आहे. तो ट्रॅक युट्यूबवर तब्बल १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. ख्रिस गेल यांनी सांगितले की, संगीत त्यांच्यात आधीपासूनच आहे. जगातील जोरदार फटकेबाजी करणारा फलंदाज ख्रिस गेल हे स्वतःला एक इंटरटेनर म्हणून घ्यायला आवडते.

युनिव्हर्स बॉस म्हणाले की संगीत ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. यावर ख्रिस गेल म्हणाले,”मी याचा खूप आनंद घेत आहे. संगीत आणि खेळ या दोन्हीच्या वातावरणात मी वाढलो आहे. ही आमच्या जमेका संस्कृतीचा मोठा हिस्सा आहे आणि हे आमच्या रक्तात आहे.”

ख्रिस गेल यांनी नुकतेच ब्रिटिश इंडियन गायक अविना शाह यांच्यासोबत एक नृत्य ट्रॅक केला आहे. याचे नाव ‘ग्रुव’ आहे, त्यात ख्रिस गेल हे एका रॅपरच्या भूमिकेत आहे. ख्रिस गेल यांनी सांगितले,”मी हा प्रोजेक्ट करण्याबाबत खूपच उत्साहात होतो. मला असं गाणं बनवायचं होत, जे प्रत्येक जण ऐकू शकतो.”

पुढे बोलताना म्हणाले,”यात आंतरराष्ट्रीय संगीत आहे. ज्यात जमेका, भारत आणि ग्रेट ब्रिटन यांचे संगीत आहे.” जमेकामध्ये याचे व्हिडीओ शूटिंग केल्यावर ख्रिस गेल आता आयपीएलच्या १३ मोसमासाठी दुबईत दाखल झाले.

ख्रिस गेल यांनी सांगितले की टाळेबंदीतील सर्व वेळ मी संगीत शिकण्यात घालवला. तसेच टाळेबंदीत स्टायलो यांच्यासोबत टू हॉट गाणं लाँच केलं होतं आणि आता हे ग्रुव हे पहिल्यांदाच एखाद्या महिलेबरोबर केलं आहे.

ग्रुव गाणं बनवताना मला खूपच मज्जा आली. यावर लोकांच्या खूपच शानदार प्रतिक्रिया आल्या आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ख्रिस गेल संगीताबाबत खूपच गंभीर आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील काही गाणे आम्ही भविष्यात लाँच करणार आहे, असं ख्रिस गेल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

बाप मजूर, आई चालवते दुकान; खेळायला मिळत नव्हता साधा बॉल, बनला याॅर्कर किंग!

वडील चर्मकार, आई करते मजुरी; मराठी मुलानं उभारलं असं साम्राज्य, आता करोडोची उलाढाल!

आई-वडिलांनी भाजीपाला विकून शिकवलं, पोरीनं साऱ्या राज्यात त्यांचं नाव करुन दाखवलं!

सोशल मीडियावरील एका व्हिडीओचा चमत्कार; रडणारा बाबा हसू लागला!

बेअरस्टोचं शतक हुकलं, मात्र केलाय असा पराक्रम ज्यात डेविड वॉर्नरही सहभागी!