चक्क चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यादरम्यान अनेकजण आपल्याला माहित असलेल्या पद्धतीने उपाय करत आहेत. तसेच काही लोक आपला घसा वेगवगळ्या पद्धतीने साफ करत असतात. परंतू एका चिमणीने घसा साफ करायची अगदी सोपी पद्धत दाखवून दिली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये चिमणी आपले तोंड आकाशाच्या दिशेने करून, आवाज काढत आहे. तिची ही आवाज देण्याची पद्धत आपण आपला घसा साफ करण्यासाठी वापरू शकतो. चिमणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘This is the way to gargle if u have a sore throat’ अशाप्रकारचं कॅप्शन दिलं आहे.

तसेच या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंट येत असून, आत्तापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 11 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वडिल इरफान खान आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बाबिलनं व्यक्त…

IPL 2021: चुरशीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर 18 धावांनी विजय

फेस सर्जरी करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात,…

‘….म्हणून दिखावा करण्याची काही गरज नाही’,…

पाकिस्तानी रॅपरनं आलिया भट्टवर बनवलं रॅप; रॅप ऐकून आलिया…