Top news

बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- facebook/Abhinay Darwade

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ विनोदी, तर कधी-कधी अतिशय सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

तसेच काही व्हिडीओ प्राण्यांचेही व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचवेळा हाणामारी करतानाचे व्हिडीओ असतात. परंतू सध्या सोशल मीडियावर एक अनोखाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गेल्या काही महिन्यापासून कोरोना रोगाने आपलं डोकं पुन्हा वर काढलं आहे. त्याचप्रमाणे सगळीकडे सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असल्याचं दिसत आहे.

या काळात काही रूग्णांना उपचारही मिळत नाहीयत. तरीही डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहेत. या काळात सगळ्यांना डॉक्टर हे देवाप्रमाणेच आहेत.
अशातच एका डॉक्टरांचा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही आईला आपल्या बाळाला झोपवताना गाणं किंवा अंगाई गाताना पाहिलं असेल. परंतू या व्हिडीओमध्ये चक्क डॉक्टर एका बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गात आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला झोपण्यासाठी डॉक्टर एक गाण म्हणत असल्याचं पाहायला मिळतं आहे. ते डॉक्टर ‘आंधी’ या हिंदी चित्रपटामधील ‘इस मोड से जाते है’ हे गाणं म्हणत आहेत. तसेच हा व्हिडीओ धुळ्याच्या निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमधील डॉ. अभिनय दरावडे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

डॉक्टरांच्या हातातील बाळा केवळ 900 ग्रॅम असल्याचं समजत आहे. बाळाचे वजन कमी असल्यामुळे सुरूवातीचे काही दिवस त्या बाळाची प्रकृती नाजून होती. परंतू डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर ते बाळ आता व्यवस्थित आहे.

त्याचप्रमाणे डॉक्टरांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झाले आहेत.
त्यांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 42 हजार लोकांनी पाहिला असून, अनेकांनी हा व्हिडीओपाहून त्या डॉक्टरांचे कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘जीने मेरा दिल लुटया…’; चिमुकल्याचा…

चक्क कुत्राही करतोय विकेंडची तयारी, पाहा व्हिडीओ

आता हेच पाहायचं राहिलं होत; चक्क गाई खेळतीय फुटबॉल, पाहा…

‘सलमान खान माझे कपडे आणि चप्पल सांभाळायचा’,…