चक्क पिंजऱ्यात लॉक केलं डोक; मात्र चावी बायकोच्या हातात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अंकारा |  आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे काही घटनाही  सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

त्यातील काही घटना या खूप प्रेरणा देणाऱ्या असतात. तर काही खूप धक्कादायक असतात. तर काही घटना अशा असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणंही कठिण होऊन जातं. तर अशातच तुर्कस्तानमधील एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, गाडी चालवताना आपल्या संरक्षणासाठी हेल्मेट घालणं आवश्यक आहे. परंतू समोर आलेल्या प्रकारामध्ये एका व्यक्तीने चक्क घरात आपलं तोंड एका पिंजऱ्यामध्ये लॉक करून घेतलं आहे. त्या व्यक्तिचा फोटो तुम्ही पाहिलात, तर तुम्हाला असं वाटलं की त्याचं तोंड त्या पिंजऱ्यामध्ये फसलं आहे किंवा अडकलं आहे.

परंतू तसं काही न होता. त्याने स्वत:च्या इच्छेने आपलं तोंड त्या पिंजऱ्यामध्ये बंद केलं असल्याचं समजतं आहे. पिंजऱ्याला ज्याप्रकारे कुलूप असतं. त्याचप्रमाणे याही पिंजऱ्याला एक लॉक आहे आणि त्याची चावी त्या व्यक्तिच्या बायकोकडे आणि त्यांच्या मुलांकडे असते.

मिळालेल्या माहितीनूसार पिंजऱ्यात तोंड अडकवून घेतलेल्या व्यक्तीचं नाव इब्राहिम युसेल असं आहे. त्याने स्वतःच हे हटके असं हेल्मेट तयार केलं आहे.हे हेल्मेट 130 फीट तांब्याच्या वायरपासून बनवण्यात आलं आहे.

परंतू इब्राहिमने हे हेल्मेट स्वत:च्या डोक्यात का घातलं, याविषयी तपास केला असता, त्यावरून एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे इब्राहिमला स्मोकिंग करायची खूप सवयी आहे. त्याच्या या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी त्याने हा अनोखा उपाय शोधून काढला आहे.

इब्राहिम वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्मोकिंग करत होता. दररोज कमीत-कमीत तो दोन तरी पाकीटं प्यायचाच. मात्र एका घटनेमुळे त्याने आपलं हे व्यसन सोडायचं ठरवलं. ती घटना म्हणजे त्याचे वडिलही खूप स्मोक करायचे आणि त्याच कारणामुळे त्यांना कॅन्सर झाला होता. काही काळानंतर त्याच आजारामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हापासून इब्राहिमने स्मोकिंग करायचे सोडून द्यायचं ठरवलं.

महत्वाच्या बातम्या-

चक्क पाण्याऐवजी आकाशातून पडतोय उंद्रांचा पाऊस, पाहा व्हायरल…

कार समोर अचानक आला बिबट्या अन्…, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! ‘या’ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा…

‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’; आईशी…

लाईव्ह शो चालू असताना झाला बाॅम्बब्लास्ट; अंगावर काटा आणणारा…