मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात.
असं म्हणतात की, माणूस हा माकडाच्या घराण्यातून जन्माला आला आहे. त्यामुळे माकडही माणसांइतकाच हुशार आणि बुद्धिमान प्राणी म्हणावा लागेल. आपल्याला माहित आहे की, माकड हा खाण्यासाठी खूप भुताळा असतो. त्याला जे पाहिजे असतं ते घेतल्याशिवाय तो त्या व्यक्तिचा पिछाच सोडत नाही.
याप्रकारचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतू तुम्ही कधी एका माकडाने एखाद्या माणसावर खुन्नस काढलेली पाहिलं आहे का?. नसेल पाहिल तर सध्या याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. यामध्ये एक माकड चक्क एका मुलीवर आपला राग काढत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
एका शाळेच्या मैदानावर काही विद्यार्थी एका रांगेत थांबले आहेत. पुढे त्यांचे शिक्षक काहीतरी त्यांना सुचना देत आहेत. तर त्याच ठिकाणी म्हणजेच शाळेच्या पार्किंगमधील एका मोटारसायकलवर एक माकड बसलेलं दिसून येतं आहे.
काही वेळानंतर अचानक ते माकड पळत-पळत जातं आणि त्या रांगेतील शेवटी उभी असलेल्या मुलीला जोरात धक्का मारत. जोरात धक्का मारल्यामुळे ती मुलगी जमिनीवरच पडते. काहीवेळासाठी त्या मुलीला नक्की काय झालं ते कळतंच नाही. मात्र नंतर आपल्याला माकडाने धक्का दिला असल्याचं तिच्या लक्षात येतं.
हे कळाल्यावर तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी तिच्यावर खूप हसतात. तसेच तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
भर मंडपातच नवरदेवानं नखरे दाखवायला केली सुरूवात, पाहा व्हिडीओ
चालता-चालता गेला सिंहाचा तोल अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ
नवरीऐवजी नवरदेवच करतोय मेकअप, पाहा व्हायरल व्हिडीओ
घरातील मांजरीने चक्क वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा व्हिडीओ
शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ