‘CBI नाही तर CID चौकशी करणार’, गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचा सभात्याग

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात राज्य सरकारवर टीका करताना पेनड्राईव्ह सादर केला होता. परिणामी वाद वाढला आहे.

फडणवीसांनी पेनड्राईव्ह सादर करत राज्याच्या गृहविभागावर गंभीर आरोप केले होते. सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

प्रविण चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाताशी धरत भाजप नेत्यांवर कारवाईसाठी प्लॅन तयार केला होता, असं फडणवीस म्हणाले होते.

फडणवीसांच्या आरोपानंतर राज्य सरकारकडून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे.

पेनड्राईव्ह प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार असल्याची घोषणा वळसे पाटील यांनी सभागृहात केली आहे. फडणवीसांनी सीबीआय तपासाची केलेली मागणी पाटील यांनी फेटाळून लावली आहे.

प्रविण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होणार नाही, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.

सीआयडीच्या तपासानंतर संपुर्ण सत्य सर्वांसमोर येणार आहे. सभागृहातच फडणवीस आणि वळसे पाटील यांच्यात जुगलबंदी रंगली होती. त्यानंतर भाजपने सभात्याग करत निषेध नोंदवला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडील आणखीन पेनड्राईव्ह लवकरच बाहेर काढणार असल्याचं सांगितल्यानंतर जोरदार राजकारण पेटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 …अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ 

‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण 

“शरद पवारांच्या हिंमतीने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं”