सिगारेट पिणाऱ्यांनो… वेळीच व्हा सावध, नाहीतर डोळेही गमावून बसाल

मुंबई | प्रत्येकाला कशाचं ना कशाचं टेन्शन असतं. अनेकजण वेगवेळ्या पद्धतीने टेन्शन घालवण्याचा प्रयत्न करतात. काहीजण टेन्शन घालवण्यासाठी सिगारेटचा वापर करतात. त्यामुळे सिगारेट ही एक प्रकारे सवय बनते.

धुम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे, असं वारंवार वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून सांगितलं जातं. मात्र, अनेकांना त्याची सवय झाल्याने लगोलग सिगारेट सोडणं अवघड जातं.

धुम्रपानमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. गंभीर प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. असं असलं तरी दररोज सिगारेट पिणारे दिवसातून 3 ते 4 वेळा सिगारेट ओढतातच.

सिगारेटमुळे कॅन्सर सारख्या इलाज नसलेल्या आजाराचा धोका असतो. अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिगारेटचे व्यसन असलेल्या लोकांचे डोळे लवकर खराब होतात, असं संशोधनामधून समोर आलं आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय. त्यानुसार  सिगारेट घेणाऱ्यांचे डोळे लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सिगारेटपासून लवकर लांब राहणं गरजेचं आहे.

सिगारेट घेत नसले तरी घेत असलेल्या सिगारेटच्या धुराड्यापासून लांब असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लहान मुलांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

दरम्यान, हार्ट अटॅक, कॅन्सर, बीपीचा त्रास यांसारखे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे सिगारेट आताच सोडणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मनसे बिनबुडाची, त्यांना बुड नाही अन् शेंडाही नाही”

प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी; बाहेर आल्यावर म्हणाले “मला भंडावून…”

“मी टाईमपास टोळी म्हणायचो पण आता…”, आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर बरसले

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाचा झटका