सलमान खानला अडवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफच्या जवानाचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडीओ!

मुंबई | बाॅलिवूडचा भाईजान सलनान खान नेहमीच चर्चेत असलेला पाहायला मिळतो. नुकतच सलमान खानला मुंबई विमानतळावर तपासणीसाठी थांबवण्यात आलं होतं. सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानानं चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुपान व्हायरल झाला. त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रत्येकजण या सीआयएसएफच्या जवानाचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे.

सलमानला रोखणाऱ्या सीआयएसएफचा जवान सोमनाथ मोहंतीवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. सोमनाथनं आपलं कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडल्यामुळं तो रातोरात प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळत आहे.  सलमाननंही नियमांचं पालन केलं आणि नंतर तो विमानतळाच्या आत गेला. सोमनाथ आणि सलमानच्या विमानतळावरील या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सलमानला थांबवल्यानंतर सीआयएसएफनं सोमनाथचा मोबाइल फोन जप्त केला. प्रसारमाध्यमांशी बोलल्यामुळे त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. कारण हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे आणि त्याला माध्यमांशी बोलल्यामुळे समज देण्यात आला.

सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की त्यांचा मोबाइल फोन यासाठी जप्त करण्यात आला आहे की जेणेकरून तो या घटनेसंबंधी मीडियाशी अधिक बोलू शकणार नाही.

सलमान खानच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्यासह सीआयएसएफ अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सीआयएसएफ जवानाने सलमानला ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटलं. तर आणखी एकाने लिहिले, ‘याला म्हणतात वर्दीची पॉवर’

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाची होत आहे. या जवानानं सलमान खानला चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोक सीआयएसएफ जवानाचे खूप कौतुक करत आहेत.

दरम्यान सलमान आणि कतरिना ‘टायगर 3’ च्या शुटींगसाठी रवाना झाले आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाचं शुटींग सुरू आहे. तर एका महत्त्वपूर्ण आणि अँक्शन सीनचं शुटींग करण्यासाठी ते रशियाला रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवस हे चित्रिकरण चालणार आहे.

https://www.instagram.com/reel/CSxqALdq9Xt/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

बिअर पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या!

…अन् पठ्ठ्यानं लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडच टॅटू म्हणून काढला, पाहा व्हिडीओ!

मुलगा हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का? – जॅकी श्रॉफ

ती वॉश बेसिनमध्ये पाय धुवायला गेली अन् बदकन आदळली; पाहा व्हिडीओ

झूम मिटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा सुरू झाला अन् शिक्षकाचं बेडवरील कृत्य सर्वांसमोर आलं