नागरिकांनो घाबरू नका… कोरोना बरा होतोय; उपचारानंतर डॉक्टरांनी निभावला पुन्हा रूग्णसेवेचा धर्म

मुंबई |  कोरोना झाला म्हणजे सगळं म्हणजे संपलं अशी भिती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. मात्र ही भिती आता उतरवण्याची वेळ आली आहे. कारण उपचारानंतर मुंबईतल्या एका डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून पुन्हा आपला रूग्ण सेवेचा धर्म निभवायला सुरूवात केली आहे.

ठाण्यातील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी तात्काळ उपचार घेऊन काहीच दिवसांत कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. उपचारानंतर त्यांनी आपले 15 बेड्सचे रूग्णालय पुन्हा रूग्णांच्या सेवेकरिता सुरू केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. उपचारानंर आता कोणतीही भीती न बाळगता त्यांनी स्वत:ला पुन्हा रुग्णसेवेत झोकून दिले आहे.

दरम्यान, देशात आणि राज्यात विविध ठिकाणी आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दररोज अनेक रूग्ण कोोरनामुक्त होऊन आपापल्या घरी परत जात आहे. भारताचा तसंच महराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता चांगलाच वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यात तथ्य- नितीन गडकरी

-…म्हणून फक्त परप्रांतीयांनाच मुंबई आणि पुण्यातून जाता येणार

-योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

-“त्या फॉर्ममुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत, सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावं”

-आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस