“नागरिकांनो नियम पाळा नाहीतर…”; राजेश टोपेंचा शेवटचा इशारा

औरंगाबाद | राज्यासह संपूर्ण देशात कोरोना रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(State Health Minister Rajesh Tope) यांनी लॉकडाऊन बाबत वक्तव्य केलं आहे.

लॉकडाऊन जर कोणी म्हणत असेल तर लॉकडाऊनचा अर्थ आताच नाही. लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची आरोग्य विभाग टास्क फोर्ससोबत झालेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये कुठेही लॉकडाऊन बाबत चर्चा झाली नाही, असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे.

लॉकडाऊनची भाषा आम्ही त्यावेळेस करू ज्यावेळेस 700 मेट्रीक टन ऑक्सिजनचं कन्सप्शन होईल तेव्हा ऑटोमॅटिक लॉकडाऊन होऊन जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

तसेच आज लॉकडाऊनबाबत चर्चा झाली नाही. कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय हे निश्चित आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. लोकांनी पहिल्या आणि लॉकडाऊनचे चटके आणि झळ सोसली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जान है तो जहा है, असं सांगितल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देखील त्याच विचाराचे आहेत. आपल्याला लोकांची काळजी अधिक घ्यायची आहे. तर अशाप्रकारचे कठोर निर्णय घ्यावे लागले तर हो घ्यावे लागतील निर्बंधाच्या अनुषंगाने आपण लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणार आहोत, असं राजेश टोपेंनी सांगितलं .

या निर्बंधाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत. थोडावेळ लागतो. यावरून नियंत्रणात आलं तरचं ठीक आहे. तसेच नाही आलं तर रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, मॉल, शाळा कॉलेज, हॉटेलसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा यावेळी राजेश टोपे यांनी दिला आहे.

लसीकरणासंदर्भात राजेश टोपे यांनी लसीकरणासाठी मोहिम राबवायची आहे, असं सांगितलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज असल्याचही सांगितलं आहे.

मात्र, अजून शाळा कॉलेज, हॉटेल, मॉल, सिनेमागृह, बंद करण्याबाबत कोणताही विचार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. परंतु, नागरिकचं कोरोना नियमांच उल्लंघन करत असतील तर परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे कठोर निर्बंध लागू करोवे लागतील, असं इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“लॉकडाऊनचे चटके लोकांनी भोगलेत, मात्र…”; मोठा निर्णय होण्याची शक्यता

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”