Top news आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे

uddhav thackeray new 6

मुंबई | कोरोना महामारीशी गेल्या दीड वर्षापासून सर्वजण लढत आहेत. कोरोना रूग्णसंख्येत काही महिन्यांपूर्वी घट झाली होती पण आता परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वीच राज्यभर वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेता नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती.

आता सरकारनं राज्यभरात नवीन नियमावली जाहीर केली आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा ठाकरे सरकारनं केली आहे.

राज्यभरात व्यायामशाळा बंद करण्याच्या घोषणा सरकारनं केली आहे. तसेच लग्न समारंभाला जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहता येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात परिस्थिती बिघडू नये म्हणून सतर्कता बाळगण्याचं आवाहनं ठाकरे यांनी केलं आहे.

आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका. राज्यातील नागरिकांचं लसीकरण करण्यावर सध्या सरकार जास्तीत जास्त भर देत आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारनं कोरोनाच्या या परिस्थितीशी लढण्यासाठी सध्या यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिणामी सध्या अनेक क्षेत्रांवर निर्बंध लावण्यात येतं आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

JIO च्या ग्राहकांसाठी खुशखबर; ‘या’ Plan वर मिळतोय जबरदस्त कॅशबॅक 

 “संजय राऊतांना जगावर बोलण्याचा अधिकार, त्यांना सर्व जगाचं कळतंय”

राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी! 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात