‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

गांधीनगर | गुजरातमध्ये कोरोनाचा मृत्यूदर काळजी वाढवणारा असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. कृत्रिम नियंत्रणाच्या प्रयत्नावरून गुजरात उच्च न्यायालयानं रुपाणी सरकारला फैलावावर घेतलं आहे.

अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयातील परिस्थितीवरून न्यायालयानं सरकारला खडे बोल सुनावले. सरकारी रुग्णालय एखाद्या अंधार कोठडीसारखं आहे. त्यापेक्षाही भयानक स्थिती आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

राज्यातील कोरोना नियंत्रणाबरोबर रुग्णांना उपचार मिळण्याविषयी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकावर न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि इलेश व्होरा यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कोरोना नियंत्रणासाठी आणि रुग्णालयातील उपचारात सुधारणा करण्यासंदर्भात न्यायालयानं राज्य सरकारला निर्देश दिले.

ही गोष्ट अत्यंत वेदनादायी आणि त्रासदायक आहे की, आजच्या घडीला सरकारी रुग्णालयातील परिस्थिती खूप दयनीय आहे. आज असं दिसतंय की सरकारी रुग्णालय अंधारकोठडीसारखंच आहे. कदाचित अंधारकोठडीपेक्षाही वाईट, अशा शब्दात न्यायालयानं गुजरात सरकारला फटकारलं.

महत्वाच्या बातम्या-

-चिंताजनक! राज्यात चोवीस तासात 87 पोलिसांना कोरोनाची लागण

-31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

-‘…तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार’; उद्धव ठाकरेंचा इशारा

-‘एक वेळ माझा गळा चिरा, पण…’; ममता बॅनर्जी आक्रमक

-‘हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नका’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं