सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडींदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुजरात दंगली प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

2002 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अहमदाबादमध्ये हिंदु-मुस्लिम दंगली पेटल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांवर आरोप झाले होते.

या दंगलीत तत्कालिन खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांच्या हत्या झाल्या होत्या. याप्रकरणी पंतप्रधान मोदींना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाली आहे.

एसटीआयने नरेंद्र मोदींसह 64 जणांना क्लिन चीट दिली होती. मात्र, एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने झाकीया जाफरी यांची याचिका फेटाळली असून पंतप्रधान मोदींना क्लिन चीट दिली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती दिनेश माहेश्वरी आणि सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून क्लिन चीट देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”

शिवसेनेनं केलेल्या ‘या’ मागणीमुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या

“महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण…”

एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका; विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य