सफाई कर्मचारी ते सुुपरस्टार; वाचा ‘या’ अभिनेत्याचा थक्क करणारा प्रवास!

मुंबई| प्रकाश राज यांना कलासृष्टीतील एक दमदार अभिनेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या मेहनतीनं आणि अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यांनी फक्त दाक्षिनात्य कलासृष्टीतच नव्हे तर बाॅलिवूड विश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रकाश राज यांचा इथपर्यंतचा प्रवास हा खूप खडतर आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचा सफाई कर्मचारी ते लोकप्रिय अभिनेता हा प्रवास खूप थक्क करणारा आहे.

अभिनेते प्रकाश राज यांचा जन्म 26 मार्च 1965 साली बंगरुळूमधील एक अतिशय गरिब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचा कल अभिनयाकडे होता. अभिनयामध्ये रुची असल्यानं त्यांची पावलं आपोआप रंगभूमीच्या दिशेने वळली.

अभिनेता म्हणून ओळख बनण्यापूर्वी त्यांनी अनेक काम केली आहे. थिएटरमध्ये सफाई करणं, कलाकारांच्या चहा पाण्याची व्यवस्था करणं, स्टेजवर लागणाऱ्या वस्तु नेऊन देणं अशा प्रकारची कामं प्रकाश राज करायचे. यासाठी त्यांना महिना 300 रुपये पगार मिळत होता.

अशी काम करत असताना त्यांना हळूहळू एखाद्या कलाकाराच्या अनुपस्थित भूमिका साकारण्याची संधी मिळायची. असं करत करत त्यांचा अभिनय क्षेत्रात पाऊल पडत गेलं. प्रकाश राज यांनी जवळपास 250 पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केलं.

प्रकाश राज यांची आवड, मेहनत, जिद्द पाहून एक दिवस बिसिलू कुदुरे या मालिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तिथपासून त्यांच्या खऱ्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली. त्यांना हळू हळू अनेक मालिकामध्ये, चित्रपटांमध्ये काम मिळत गेलं.

प्रकाश राज यांनी अनेक तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक प्रकारची पात्र साकारली. त्यांनी विनोदी, खलनायक, तरुण, वृद्ध अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. प्रकाश राज यांना भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

महत्वाच्या बातम्या – 

‘दबंग’ खानच्या कुटुंबातील ‘ही’…

“देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींपेक्षा मोठे नेते झाले…

जमिनीवर बसलेल्या बाळाला माकडानं घेतलं कुशीत…

“एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीसांची जुनीच पद्धत…

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली…