…अन् आमदार संदीप क्षीरसागर स्वत: झाडावर चढले!, वाचा नेमकं काय झालं

बीड | देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भारत जगातील देशांना लोकशाहीच्या प्रमुख स्वरूपात पहायला मिळला.

देशात प्रजासत्ताक दिनानिमित्तानं विविध ठिकाणी झेंडा फडकवला. सरकारी, खाजगी कार्यालायांमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकत आहे. अशात आजच्या दिवशीत काही ठिकाणी आंदोलन देखील झाली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य ध्वजारोहन केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. अशात बीडमधील आंदोलनाची चर्चा राज्यात जोरदार पद्धतीनं होत आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालायात शासकीय झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम चालू असताना दोन घटना घडल्या आहेत. दोन वेग-वेगळे आंदोलन या ठिकाणी करण्यात आली.

दोन महिन्यांपासून वेतन नसल्यान सफाई कामगारांनी आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 24 तासांपासून बीडमधील सफाई कामगार आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत हे लक्षात येताच आंदोलकांनी एका वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं आहे.

सफाई कामगार महिला चक्का झाडावर चढून आंदोलन करू लागल्या परिणामी उपस्थित सगळ्यांंनाच मोठी काळजी लागली होती. अशा परिस्थितीत बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी स्वत: झाडावर चढून त्या आंदोलन करणाऱ्या महिलांशी चर्चा केली.

बीड नगरपरिषदेत सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार देण्यात आलेला नाही. परिणामी त्यांना आंदोलन करावं लागत आहे.

संदिप क्षीरसागर यांनी विनंती केल्यानंतर आंदोलक महिला झाडावरून खाली यायला तयार झाल्या. मात्र सध्या राज्यभरात महिलांच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील या आंदोलनानं पुन्हा एकदा सफाई कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. राज्यभरात सफाई कामगारांचे प्रश्न सरकार कधी सोडवणार अशी चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये” 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं