महाराष्ट्र मुंबई

त्यांनी तयार केलेलं ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागतायत; राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाना

मुंबई | भाजपने तयार केलेलं ‘सोशल’ औषध आता त्यांनाच कडू लागत असल्याचा, टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका आणि अश्लील शिवीगाळ किंवा टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जात असल्याची तक्रार भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना आक्रमकपणे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

याच विषयावर भाष्य करताना क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाने तयार केलेले ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागत असल्याचे व्यंगचित्र काढून भाजपावर निशाणा साधला आहे. क्लाईड क्रास्टो नेहमीच व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपवर प्रहार करत असतात.

दरम्यान, सोशल मीडियावर ट्रोल प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे. येत्या काळात यावरुन आणखी गदारोळ पहायला मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

-डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

-पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय

-जागा चार, नावं सात… ‘या’ नावांपैकी भाजप नेमकी कुणाला देणार संधी?

-काय सांगता??? फेसबुकवर आता चक्क पैसे कमवण्याची संधी