“कोरोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल”

मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जावून जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करत आहेत. परिचारिकांच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचं स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत, असं अजित पवार म्हणाले

कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत, असंही अजित पवारांनी म्हटलंय.

स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपूरे आहेत, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार

-गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोराना एकही नवा रुग्ण आढळला नाही

-युवक काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

-कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका- राहुल गांधी