महाराष्ट्र मुंबई

…म्हणून ग्रामीण भागात 10 हजार तर शहरात 15 हजार रुपयांची मदत करणार- मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारने 4700 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. रोख स्वरुपातील मदतीपासून शेती, मृत जनावरे यांचीही भरपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारने दोन जिल्ह्यासाठी 4700 कोटी तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2105 कोटी रुपये मान्यता दिली आहे.

राज्य सरकार 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. मात्र तोपर्यंत राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपत्कालिन तरतूद म्हणून ही भरपाई देणार आहे.

पडलेली घरं पुन्हा बांधून देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. पूर्ण नवीन घरं, घरांची दुरुस्ती किंवा पूर्ण घर शिफ्ट करण्यासाठी 222 कोटी रुपये देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पोर्टल उघडून मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पूरग्रस्त गावांना काय काय मिळणार?

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4700 कोटी रुपयांची मदत

कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2105 कोटी रुपये मान्यता

पोलीस पाटील आणि सरपंच यांनी जरी पंचनामा दिला तरी तो ग्राह्य धरला जाईल

पूरग्रस्तांना शहरात 15 हजार, ग्रामीण भागात 10 हजार रुपये थेट देणार

ग्रामीण भागात 10 हजाराव्यतिरिक्त जमिनीचे पैसे, मृत जनावरांची नुकसान भरपाई आणि पिकाचे पैसे देणार

शहरी भागात 15 हजार व्यतिरिक्त इतर मदत थेट स्वरुपात नाही

घरांसाठी – पूर्ण नवीन घर बांधणे, दुरुस्ती करणे, पूर्ण घर शिफ्ट करणे यासाठी 222 कोटी

प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल उघडून यातून मदत केली जाणार

कचरा साफ करण्यासाठी – 66 कोटी

दगावलेल्या जनावरांसाठी – 30 कोटी

पिकांच्या नुकसानीसाठी, ऊस पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे –

मत्स्य व्यवसायासाठी – 11 कोटी

सार्वजनिक विभाग, नगरपालिका, महापालिका यांचे रस्ते दुरुस्तीसाठी – 876 कोटी

जलसंपदा आणि जलसंधारण – 168 कोटी

छोटे व्यावसायिक नुकसानीच्या 50 टक्के आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये मदत करणार – त्यासाठी 300 कोटी

केंद्राकडे 6800 कोटी रुपयांची मागणी करणार 

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्त आणखी सावरले नाहीत अन् भाजप म्हणतंय मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवा!

-“तू आम्हाला प्रत्येक क्षणी आठवतेस…आणि तू आमच्या सोबत अनंत काळापर्यंत राहशील”

-मराठमोळ्या क्रिकेटपटूची पूरग्रस्तांसाना मदत; इतरांनाही केलं मदतीचं आवाहन!

-“तुमच्याकडे जय श्रीराम, तर आमच्याकडे सिताराम”

-बीग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेंना मिळाली नियमभंगाची शिक्षा

IMPIMP