नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ‘या’ नेत्याने थोपटले दंड!

नागपूर : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय नेते आतापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा चिखलफेक करताना दिसत आहे. त्यात राज्याची उपराजधानीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम हा हॉट मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात लढायला कोणी तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वॉकओव्हर मिळेल, असं वक्तव्य सत्ताधारी भाजपचे नेते संदीप जोशी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.

संदीप जोशी यांच्या वक्तव्यानंतर प्रशांत पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहे. 2004 मध्ये प्रशांत पवार यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती.

मनसेला रामराम करत प्रशांत पवार यांनी जय जवान जय किसान संघटनेची स्थापना केली. आता प्रशांत पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कंबर कसली आहे.

काँग्रेसने उमेदवारी दिल्यास चांगलंच आहे. अन्यथा आपण स्वतंत्र लढणारच आहोत, असं पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-