साताऱ्याचा खरा विकास मुख्यमंत्र्यांनीच केला; उदयनराजेंचा घरचा आहेर

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मित्रपक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली, असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

सत्तेसाठी लाईन लावून उभं राहणं माझ्या स्वभावात नाही, असं स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले.

राजकारणात माझी बांधिलकी कायम माझ्या मतदारसंघाशी राहिली आहे. सत्ता असो नसो जनतेच्या सेवेत वाहून घेण्याचा माझा स्वभाव आहे, असंही ते म्हणाले.

त्यामुळे भाजपकडे सत्ता आहे म्हणून मी तिथं जाईन असा तर्क काढणं चुकीचं आहे. योग्य वेळी सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, त्यामुळे आता कोणीही कसलेही तर्कवितर्क काढू नये, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-