नांदेड : वंचित बहुजन आघाडी आता ए टीम होत असून पुढच्या विधानसभेत ‘वंचित’चा विरोधी पक्ष नेता पाहायला मिळेल, असं भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलं. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीसांच्या भाकितानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आत्मविश्वास दुणावला असेल.
‘ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटलं, ती काँग्रेस राष्ट्रवादीच बी टीम व्हायला लागली. आणि वंचित बहुजन आघाडी ए टीम व्हायला लागली. आता तुम्ही ही काळजी केली पाहिजे, की मला असं दिसतंय की पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल. तो काँग्रेस राष्ट्रवादीचा नसेल.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने एक सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेसला दिला आहे. वंचितने काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली आहे. सोबतच राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घ्यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. यासाठी बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीही चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेस आणि वंचितमध्ये बैठक झाली तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी 48 पैकी 22 उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही जाहीर केलेल्या जागा सोडून इतर जागांबाबतच काँग्रेसने बोलावं, असं वंचितकडून सांगण्यात आलं होतं आणि अखेर वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली.
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ गोलंदाज मोडणार कपिल देव, जहीर खान, हरभजन सिंग या दिग्गजांचा विक्रम! – https://t.co/nWdM9CdoGN @BCCI @harbhajan_singh @therealkapildev @ImIshant @ICC
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
सोलापुरातील अमित शहांची सभा उधळवून लावू- भीम आर्मी – https://t.co/F3whL8Q8Lp @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
भारत मजबूत स्थितीत;विराट, मयांकची अर्धशतकी खेळी – https://t.co/I7jLN8gvzN @imVkohli @mayankcricket @BCCI
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019