मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा 1 ऑगस्टापासून सुरु झाली होता. या यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसात पार पडणार आहे. या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नंदुरबारमधून होणार असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे. सांगली कोल्हापूरात आलेल्या पुरामुळे या यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे, 55 मतदारसंघातून जाणार आहे. यात 39 जाहीर सभा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार असून समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे.

पूरग्रस्त पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर सुरु होणार आहे, असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली आहे. 

महाजनादेश यात्रेत 3 हजारांपेक्षा जास्त लोक आले तर मुख्यमंत्री रथातूनचं नागरिकांना मार्गदर्शन करतील, असंही ठाकूर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून थांबवण्यात आलेल्या यात्रांचा पुढच्या टप्प्यांच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

-स्वातंत्र्यदिनी वीरपुत्राचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान

-राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे करणार पूरस्थितीची पाहणी

-डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावरुन मध्यस्थी करणार नाहीत!

-“खरा तो एकची धर्म…” म्हणत उर्मिलाची पूरग्रस्तांना मदत

-राजस्थानमध्ये पोषण आहारातून 36 मुलांना विषबाधा