महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाचं काय झालं???; पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग काम करत आहे. लवकरच या शिफारशी न्यायालयात सादर करण्यात येतील. या शिफारशींच्या आधारावरच मराठा आरक्षणाबद्दल अनुकूल निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

राज्य सरकारने सारथी नावाची संस्था स्थापन केली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था असं या संस्थेचं नाव आहे. तिचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

छत्रपती संभाजीराजेंची इच्छा-

मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयात असला तरी सरकारच्या हातात काही गोष्टी आहेत. त्या गोष्टींची वेळेत पूर्तता व्हावी, अशी इच्छा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. 

उच्च न्यायालयानं फटकारलं-

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. मराठा आरक्षणाचं काय झालं? अहवाल तयार झाला की नाही?, असे सवाल उच्च न्यायालयानं विचारले आहेत. शुक्रवारपर्यंत राज्य सरकारला यावर उत्तर द्यावे लागणार आहे.

IMPIMP