महाराष्ट्र मुंबई

शरद पवार शेजारी बसलेले… अन् मुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणावर म्हणतात…

मुंबई |   माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पवारांच्यात चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली.

हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही. आम्हाला देखील माहित नसतं आमच्या पक्षात कोण येणार आहे. आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसऱ्या दिवशी समजतं. त्यामुळे अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायलाही भीती वाटते, असं मुख्यमंत्री म्हणताच मंचावर आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

देशाच्या संसदेने, राज्याच्या विधिमंडळाने याआधी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली आहेत. शेकाप नेते उद्धवराव पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस विषयाची चांगली तयारी करून मांडणी करत, सध्याचे मुख्यमंत्रीही अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी करतात, असं शरद पवार म्हणाले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह विविध नेत्यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील त्यांचा वारसा योग्यरीत्या चालवत आहेत, त्यांचे हे पुस्तक निश्चितच नव्या सदस्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा मला विश्वास पवारांनी व्यक्त केला तर विधान मंडळ कामकाजाचं ‘हँडबूक’ म्हणजेच ‘विधानगाथा’ हे पुस्तक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-पवार साहेब… ‘या’ नेत्याने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय- जितेंद्र आव्हाड

-शोलेचा डायलॉग बदलून आता म्हणावं लागतंय ‘जो डर गया वो भाजप में गया’!

-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या गडानंतर सोलापूरचा बुरूज ढासळणार??

-अन् मुस्लिम महिलांना न्याय देणारं ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत मंजूर!

-छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार??? उद्धव ठाकरे म्हणतात…

IMPIMP