शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!

वर्धा | काही पक्षांची अवस्था झाली आहे की पक्षात रहावे म्हणून कार्यकर्त्यांना शपथ दिली जात आहे. मात्र शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे.

भाजपची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू आहे. त्याच यात्रेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार चिमटे काढले.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना  पक्षाक्षी एकनिष्ठ राहण्याची आणि पवारांची साथ न सोडण्याची शपथ दिली आहे.

भाजपमध्ये येण्यासाठी अनेक लोक इच्छूक आहेत. परंतू आमच्याकडे मर्यादित संख्या असल्याने आम्ही काही थोडीच लोकं पक्षात घेणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन केलं तर उत्तर मिळेल. लोकांच्यात मिसळले असते तर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, महाजनादेश यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. भाजप-शिवसेना युती मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे

-“220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??”

-“भाजप-सेनेची यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी मात्र राष्ट्रवादीची रयतेच्या बुलंद आवाजासाठी”

-उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???

-…तर काट्याने काटा काढावा लागेल; शिवेंद्रराजेंचं खुलं आव्हान