जळगाव | काँग्रेस-राष्ट्रवादीने मेगा भरतीची नाही तर मेगा गळतीची चिंता करावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जळगावच्या सागरपार्क मैदानावर आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
शरद पवार आणि अशोक चव्हाण हे दोघेही भाजपामधल्या महाभरतीवर बोलत असतात. आधी या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाला लागेल्या महागळतीची चिंता करावी, असा खोचक टोला त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लगावला.
सध्याच्या घडीला राज्यातले सगळे प्रश्न सुटले, सगळ्या समस्या मार्गी लागल्या असा माझा मुळीच दावा नाही. मात्र शेतकरी, सामान्य वर्ग नागरिकांच्या हिताचे अनेक प्रश्न युती सरकारने सोडवले आहेत. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवणारे सरकार आहे असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. त्यामुळे आम्हाला लोक आशीर्वाद देतील आणि निवडूनही देतील, असं ते म्हणाले.
२००४ ते २०१४ पर्यंत केंद्रात आणि राज्यात आघाडीचेच सरकार होते. त्यांना ईव्हीएमद्वारेच मतदान करण्यात आले. आताच नेमके ईव्हीएमवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?, असं म्हणत त्यांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करणाऱ्या विरोधकांवर टीका केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा धुळे येथून सुरु झाला आहे. ही यात्रा आता जळगावात पोहचली आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यावर खासदार उदयनराजेंचा बॉम्ब…! https://t.co/b0RlWtRzE6 @Chh_Udayanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019
काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काहीच मिळालं नाही- दिलीप मानेhttps://t.co/MRtIEA6tWA @Mla_DilipMane @INCMaharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारच काँग्रेसवर नाराज??? https://t.co/UnC2Hieqmf @VijayWadettiwar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019