महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई  | विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीये. युतीत मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा सुरू होता. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खुशखबर दिली आहे.

आपण आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहोत. त्यांना सरकारचा भाग म्हणून पाहायला आम्हाला आवडेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले आहेत.

आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास आमची कुठलीही हरकत नाही. आम्ही आत्ताही त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहोत, असं ते म्हणाले.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आदित्य यांच्याविषयी भाष्य केलं. ठाकरे घराण्यातील आदित्य हे निवडणूक लढवणारे पहिले सदस्य ठरतील, असं ते म्हणाले.

 आदित्य ठाकरे यांना तरूणाईचा वाढता पाठिंबा आहे. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना मोठा प्रतिसादही मिळतो आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, महाजनादेश यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. भाजप-शिवसेना युती मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी स्वत: शरद पवार जबाबदार- विनायक मेटे

-चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

-विधानसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंनी खास प्लॅन आखला! यशस्वी होणार??

-भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे- देवेंद्र फडणवीस

IMPIMP