जेठमलानी यांच्या जाण्याने देशाने निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई | देशातील ज्येष्ठ आणि सर्वोत्कृष्ट वकील आणि माजी केंद्रिय कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्याप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली व्यक्त केली आहे.

जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील सर्वोत्कृष्ट आणि एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जेठमलानी यांची विधी, समाजकारण आणि राजकारण यातील कारकीर्द वैशिष्टपूर्ण होती. फौजदारी कायद्याबरोबरच दिवाणी कायद्यावरही त्यांचा अधिकार होता, अशा शब्दात त्यांनी जेठमलानी यांच्या कार्याचा गौरव मुख्यमंत्र्यांनी अधोरेकित केला.

आपल्या कर्तबगारीने त्यांनी आदर्श मापदंड निर्माण केला होता. त्यांनी लढलेले खटलेही मैलाचे दगड ठरले होते. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्याभरापासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते.

राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या हत्या ते चारा घोटाळा पर्यंतचे खटले लढवले आहेत. याशिवाय लोकसभेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु आणि सोहराबुद्दीन एनकाऊन्टरमध्ये अमित शाह यांचा खटलाही त्यांनी लढवला आहे.

महत्वाच्या बातम्या-