मुंबई | काही दिवसांपूर्वी सांगली-कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अलमट्टी धरणातून फार उशिरा पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापुरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हाणी झाली.
कोल्हापूरमधील धरणक्षेत्रात गेल्या काही तासांपासून प्रचंड पाऊस सुरु आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पूर कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती झाली आहे. कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारं राधानगरी हे धरण १०० टक्के भरलं असून आता या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
कोल्हापुरात गंभीर पूरस्थिती उद्भवू निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कर्नाटक सरकारशी संपर्क साधला आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
सध्या अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु आहे. पण हा विसर्ग आणखी ५० हजार क्यूसेक वेगाने करण्यात यावा. जेणे करून पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला केली आहे.
दरम्यान, कोल्हापूरात पुन्हा गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीला कितपत यश येतं हे बघावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
1.20 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपात ‘या’ अभिनेत्याला अटक- https://t.co/2hMHo71SrL #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
शाहरुखला जाहिरात करणं पडलं महागात; घोटाळेप्रकरणी चौकशीचे आदेश- https://t.co/2qEWgJ1z1b #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
“भाजप म्हणजे मोठं घर पोकळ वासा; मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचीच ‘ही’ अवस्था”https://t.co/07WqYFqrl4 @INCMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019