मुंबई | राज्यात महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. मात्र, या सत्ता बदलाचा फटका विदर्भाला बसण्याचे चिन्ह आहेत. कारण सत्तांतर होताच नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय मुंबईत हलवण्यात आलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालय नागपुरमध्ये सुरु केलं होतं. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयही इथेच होतं. मात्र, हे कार्यालय मुंबईत हलवण्यात आल्याने विदर्भातील सर्व रुग्णांना मदतीसाठी मुंबईत जावं लागणार आहे.
नागपुरमधील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून करणार आहेत. तसेच मंत्री नितीन राऊत हेही कार्यालय पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, सत्ताबदलाचा फटका विदर्भवासियांना बसत आहे. मुख्यमंत्र्यांनी हजारो रुग्णांचे हाल लक्षात घेत कार्यालय पुन्हा सुरु करावे, अशी मागणी विदर्भातील जनता करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरकार दाऊदला क्लीन चीट देणार’ या टीकेवर सचिन अहिरांच भाजपला प्रत्युत्तर – https://t.co/JwDtEWr72X @AhirsachinAhir @BJP4Maharashtra @mohitbharatiya_ @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
पंकजा मुंडेंच्या फेसबुकवर पुन्हा ‘कमळ’ अवतरलं! – https://t.co/7jC6HE0MN6 @Pankajamunde @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
फडणवीस यांच्या भाषणात सत्तेचा दर्प अधिक होता… हाच दर्प भाजप ला नडला- शरद पवार-https://t.co/qpcMs2JEm5 @PawarSpeaks @Dev_Fadnavis @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019