मुंबई | अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोपांची मालिकाच लावली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं कौतुक केलं आहे.
नवाब मलिक यांनी कालही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा बाजार सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता.
देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी फडणवीसांवर मुन्ना यादव, रियाझ भाटी यांच्यावरुन फडणविसांवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं गुड गोईंग अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. कधी कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही. 20 वर्षापूर्वीची व्यक्ती आज वेगळी असते. गुंड पुंड भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये स्वच्छ होतो, असंही फडणवीस म्हणालेत.
निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेलेय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत, असंही ते म्हणालेत.
नवाब मलिक यांचे हल्ले जोरदार आहेत. एका चिडीतून ते करत आहेत. मी राज्यपालांना भेटलो. त्यांच्याशी यावरही चर्चा केली पाहिजे. समेट घडवला पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस इतरांवर अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप करत आहेत. मात्र,अंडरवर्ल्डचे लोक, ज्यांचे संबंध आहेत, गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डांचं अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरचा गुंड आहे. तो आपला राजकीय दबाव करणारा साथीदार आहे. त्याला आपण कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही. मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला होता की नव्हता?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
दरम्यान, मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तात्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी नोबल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या एका सुविचाराचा आधार घेतला आहे.
कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत
आता इंस्टाग्राम खर्चिक होणार; मोजावे लागणार ‘इतके’ रूपये
रामदास कदमांचा पत्ता कट? ऑडिओ क्लिप प्रकरण भोवण्याची शक्यता
ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार
मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग