महाराष्ट्र मुंबई

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

मुंबई : मुख्यमंत्री स्वत: आमच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी फोन करत आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात लोक राहण्यास का तयार नाही याचं आत्मचिंतन पवारांनी करावं, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यातील निवडक आमदारांना भाजपमध्ये घेण्यात येईल, असं त्यांनी म्हणत त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. 

ज्या आमदारांवर ईडीची चौकशी सुरु आहे त्यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. अशा लोकांची भाजपला गरज नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपला आता कोणावर दबाव टाकून पक्षात बोलवण्याची गरज आता भाजपवर वेळ  राहिली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही- चंद्रकांत पाटील

-‘बाजी पलटने में देर नही लगती…’; धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल

-“शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा”

-“फडणवीस साहेब, भाजपची मेगाभरती थांबली असेल तर बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा”

-भाजपसाठी मोकळ रान; काँग्रेस-जेडीएसचे 14 बंडखोर आमदार अपात्र घोषित

IMPIMP