मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीस राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना केलं निमंत्रित

मुंबई |  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी तसंच काँग्रेसचे प्रमुख नेते त्याचबरोबर विरोधी पक्ष भाजप आणि मनसेला देखील निमंत्रित केलं गेलं आहे. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती कळतीये.

या बैठकीत कोरोनाबाबतच्या होत असलेल्या उपाययोजनांवर तसंच लॉकडाऊन शिथील करण्यावर चर्चा होणं अपेक्षित मानलं जात आहे. विरोधी पक्षांची मतं आणि त्यांच्या सूचना मुख्यमंत्री ऐकून घेऊन त्यावर देखील कार्यवाही करण्याची तयारी तयारी दाखवू शकतात.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1233 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईची कोरोनाबाधित रूग्णांची आकडेवारी ही राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांनी 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील त्या वादग्रस्त ट्विटवर; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

-…तर तुम्ही दारूच्या बाटल्या घरपोच पुरवण्याची सेवा सुरू करावी; राऊतांचा ‘राज’समर्थकांवर निशाणा

-मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच- नारायण राणे

-नोकरभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या- रोहित पवार

-‘…तर आर्मी बोलवावी लागेल’; किशोरी पेडणेकरांचा इशारा