कोरोना परिस्थितीबाबत राज्यपालांनी बोलावली होती बैठक; मुख्यमंत्री जाणार नाहीत!

मुंबई | मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाबतची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका करत राज्यपालांना निवेदन दिलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय.

महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेवर तसंच उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसंच काही विशेष अधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार नसल्याची माहिती समजत आहे.

कालच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकारविरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यानंतरच राज्यपालांनी लगोलग विशेष बैठकीचं आयोजन केलं आहे.

दरम्यान, स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड होतीये, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या, गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडलेली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, असं फडणवीसांनी निवेदनात नमूद केलं होतं. याच विषयांसह इतरही कही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार होती.

महत्वाच्या बातम्या-

-…तर मुख्यमंत्री महोदय चुकीला माफी नाही; भाजपचा इशारा

-रेल्वेनंतर विमानसेवा देखील सुरू होणार, या तारखेपासून विमाने उड्डाण घेणार…

-फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा डाव- बाळासाहेब थोरात

-शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना, त्यावर निलेश राणेंची खोचक टिप्पणी

-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला