ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई |  ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारचं, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली आहे. 30 जूनला संपणाऱ्या लॉकडाऊनला आता आता दोन दिवस बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रवासियांशी संवाद साधत आहेत.

बोगस बियाण्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आमच्या बळीराजावर आहे. पण बळीराजाने काळजी करू नये. शेतकरी बांधवांना हे शासन नुकसान भरपाई मिळवून देईल आणि संबंधित आरोपींना शिक्षा करणार म्हणजे करणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, असं सांगत कोरोनाचा धोका टळलेला नाही. इथे आड तिथे विहिर अशीच ही परिस्थिती आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं.

आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ, त्याची भीषणता अधिक होती, मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न केले. आर्थिक नुकसान अतोनात झालंय. पण आपण संकटाला तोंड देत आहोत. विठूरायाला मी मागणं मागतो की आमच्यावरचं हे कोरोनाचं संकट दूर कर, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-‘पडळकर…रात्रभर झोप येणार नाही अशा शिव्या देऊ’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पडळकरांना दम

-आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …

-‘खरं राजकारण तर…’; शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

-30 जूननंतर लॉकडाउन उठणार का?, उद्धव ठाकरे म्हणाले…